पुणे रेल्वे स्थानक; सोलापूर विभागाने पॉवर कार न जोडल्याचा परिणाम हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे स्थानक; सोलापूर विभागाने पॉवर कार न जोडल्याचा परिणाम  
हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय
पुणे रेल्वे स्थानक; सोलापूर विभागाने पॉवर कार न जोडल्याचा परिणाम हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय

पुणे रेल्वे स्थानक; सोलापूर विभागाने पॉवर कार न जोडल्याचा परिणाम हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सोलापूर विभागाने पाठविलेल्या हुतात्मा एक्सप्रेसच्या रेकला पॉवर कार न जोडल्याने दोन दिवस ही गाडी रद्द करण्यात आली. याचा फटका रविवारी पुण्यातील दीड हजार प्रवाशांना बसल्याने त्यांनी संतप्त व्यक्त केला आहे.

पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस सुटण्याच्या आधी अर्धा तास रेल्वे प्रशासनाने ही गाडी रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांनी याबाबत थेट पुणे स्थानकाच्या व्यवस्थापकांना विचारला. मात्र, सोलापूरहून आलेल्या रिकाम्या रेकला पॉवर कारच नसल्याने पुणे विभाग हतबल झाले.

रेल्वे प्रशासनाने रविवारपासून पुणे-भुसावळ एक्स्प्रेस सुरु केली. सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस व पुणे-भुसावळ एक्स्प्रेसचे रेक इंटिग्रेशन आहे. रविवारी सोलापूरहून आलेली हुतात्मा एक्स्प्रेस पुण्याहून भुसावळला गेली. पुण्याहून सोलापूरला सायंकाळी निघणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसला सोलापूरने पाठविलेल्या रेकला पॉवर कार जोडण्यास विसरले. पॉवर कार नसल्यास गाडीत लाइटच (वीज) उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुण्याकडे पॉवर कार उपलब्धता नसल्याने अखेर रविवारची पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे सोमवारी सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस व पुणे-भुसावळ एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
‘रेक फिट’चा मेमो दिला कसा?
‘रेक फीट’ करण्याची जवाबदारी मॅकेनिकल व इलेक्ट्रिक विभागाच्या सीनियर सेक्शन इंजिनिअरची (एसएसइ) असते. डब्यांची संख्या, अन्य स्थिती पाहून हा मेमो देण्यात येतो. मगच ती रेक धावण्यास सज्ज होते. या वेळी पॉवर कार आहे की नाही हे पाहण्याची जवाबदारी देखील दोन्ही विभागाच्या एसएसई यांची होती. त्यांनी तपासणी न मेमो दिल्याचे समोर आले आहे.

पुणे स्थानकांवर गाडी सुटण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधी अचानक रेल्वे प्रशासन जाहीर करते रेल्वे रद्द झाली. पुण्यात पाऊस सुरु आहे. आम्ही कसे बसे स्वारगेट बस स्थानकावरून एसटी बस धरली. परंतु लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
-पियुष संगापूरकर, प्रवासी
--
पॉवर कार न जोडल्याने ही समस्या निर्माण झाली. का असे घडले याची माहिती घेतली जात आहे. सोमवारची सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
-प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26730 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top