प्रवास खडतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवास खडतर
प्रवास खडतर

प्रवास खडतर

sakal_logo
By

पुणे शहर व परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम जीवनमानावर झाला आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. भर पावसात सकाळच्या वेळेत कार्यालयात पोहचण्याची गडबड असल्याने खड्ड्यांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पीएमपी, एसटी प्रवासी वाहतुकीवरही पावसामुळे परिणाम झाला. एसटी बस ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.


पुणे, ता. ११ ः आठवडाभरापासून संततधार पावसामुळे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी केलेले रस्ते उखडण्यास सुरवात झाली आहे. निकृष्ट कामाचे परिणाम करदात्या पुणेकरांनाच भोगावे लागत असून, हादरे बसून कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. समान पातळी नसल्याने रस्‍त्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातच रस्त्यांवर पसरलेल्या खडीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात वर्षभरापासून रस्ते खोदाई सुरू आहे. पाणी पुरवठा, मलः निसारण विभागाच्या कामासाठी रस्ता खोदल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्त केले गेले. मोबाईल, इंटरनेट कंपन्यांच्या केबल, विद्युत वाहिन्या टाकल्यानंतर महापालिकेने रस्त्यावर डांबरीकरण केले. पण, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते पूर्ववत करा, असे आदेश दिल्यानंतर रस्ते दुरुस्त केले. मात्र, त्यावर लगेच खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे एकाच बाजूने डांबरीकरण करणे, डांबरीकरण करताना पाणी वाहून जाण्याची व्यवस्था न करणे यामुळे प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये पाणी साचत आहे. पावसाळी गटारांच्या बाजूने चढ असल्याने त्यातून पाणी वाहून जाऊ शकत नाही, अशी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आली. त्यामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक सोसायट्यांच्या गेटसमोरच तळे साचत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह चौकांमध्येही मोठमोठे खड्डे पडले आहेत. चेंबरच्या बाजूने, गतीरोधकांवरही खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याच त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे.

समाविष्ट गावांमधील स्थिती भीषण
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील रस्त्यांची स्थिती भीषण झालेली आहे. तेथील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडणे, चिखल होण्यामुळे रस्ते धोकादायक झाले आहेत.

नक्की काय अडचणी
- खोदाईनंतर दुरुस्त केलेले रस्ते खचले
- रस्‍ते समपातळीत नसल्याने पाणी साचण्याचे प्रमाण मोठे
- खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ
- खड्डे बुजविण्याचे काम मंदगतीने सुरू

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..