खगोलभौतिकीमध्ये एम.एससी. करण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खगोलभौतिकीमध्ये एम.एससी. करण्याची संधी
खगोलभौतिकीमध्ये एम.एससी. करण्याची संधी

खगोलभौतिकीमध्ये एम.एससी. करण्याची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांच्या वतीने एम.एस्सी खगोलभौतिकी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मुदत १७ जुलैपर्यंत आहे.
अभ्यासक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. संशोधनाबरोबरच खगोलीय डेटा ॲनॅलिसिस, मॅनेजमेंट आदी क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहे. निवड झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमांच्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी एक हजार रुपयांच्या मासिक शिकवणी शुल्काच्या परतफेडीसाठी पात्र असतील. लायगो, स्क्वेअर किलोमीटर अरे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग आहे. यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

पात्रता ः
- बी.एस्सी. (द्वितीय वर्षापर्यंत गणित आवश्यक) किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण
- पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के आवश्यक
- जॉईन्ड एन्ट्रान्स स्क्रिनींग टेस्ट (जेस्ट २०२२) च्या गुणांच्या आधारे निवड

प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळ ः
https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संशोधन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी योग्य संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही उत्तम आहे.
- डॉ. संदेश जाडकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26796 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..