जेईई मेनचा निकाल जाहीर देशात जस्ती यशवंत पहिला, महाराष्ट्रात अडवाई कृष्णाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई मेनचा निकाल जाहीर 

देशात जस्ती यशवंत पहिला, महाराष्ट्रात अडवाई कृष्णाची बाजी
जेईई मेनचा निकाल जाहीर देशात जस्ती यशवंत पहिला, महाराष्ट्रात अडवाई कृष्णाची बाजी

जेईई मेनचा निकाल जाहीर देशात जस्ती यशवंत पहिला, महाराष्ट्रात अडवाई कृष्णाची बाजी

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन २०२२’च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला. देशात पहिला क्रमांक तेलंगणाच्या जस्ती यशवंत व्ही. व्ही. एस. याने पटकावला, तर महाराष्ट्रामध्ये अडवाई कृष्णा याने बाजी मारली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जून सत्र परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला आहे. ‘एनटीए’ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यासाठी जेईई मेन अंतिम उत्तरतालिका आधीच जाहीर केल्या आहेत. देशभरातून सुमारे आठ लाख ७२ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील सात लाख ६९ हजार ५८९ परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे यातील तीन विद्यार्थी हे तृतीयपंथी होते. जेईईच्या सत्र २ चे आयोजन २१ ते ३० जुलैदरम्यान होईल, तर बी. आर्किटेक्ट आणि बी. प्लॅनींगचे निकाल लवकर जाहीर करण्यात येईल, असेही ‘एनटीए’ने घोषित केले आहे.

...तर जेईई ॲडव्हान्सला संधी
जेईई मेनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर ‘एनटीए’द्वारे दोन्ही टप्प्यांसाठी एकत्रित एनटीए रँक जाहीर केल्या जातील. त्याच रँकच्या आधारे अंतिम कट ऑफ जाहीर केला जाईल. उमेदवारांना मिळालेले गुण यामध्ये वापरले जाणार नाहीत. ‘एनटीए’कडून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पर्सेंटाइल स्कोअरच्या सामान्यीकरणानंतर रँक लिस्ट आणि कट ऑफ मार्क्स तयार केले जातील. टॉप २.५० लाख रँक उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल.

आकडे बोलतात ः
अर्ज करणारे एकूण विद्यार्थी ः ८,७२,४३२
एकूण परीक्षा केंद्र ः ५८८
दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ः २,३५७

निकाल पाहण्यासाठी ः jeemain.nta.nic.in

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26943 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top