‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ समूहाची सायकलवर पंढरीची वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ समूहाची सायकलवर पंढरीची वारी
‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ समूहाची सायकलवर पंढरीची वारी

‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ समूहाची सायकलवर पंढरीची वारी

sakal_logo
By

‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’
समूहाची सायकलवर पंढरीची वारी
पुणे ः ‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ या समूहातील वीस सदस्यांनी पंढरीची सायकलवारी नुकतीच पूर्ण केली. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी या सायकलवारीचे आयोजन केले होते. प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी सायकलवारीचा संदेश या उपक्रमातून दिला. समूहातील अठरा सदस्यांनी पुणे ते पंढरपूर हे २१० किलोमीटरचे अंतर एका दिवसात पूर्ण केले. तर, नागेश मेहता व सत्यन शहा या दोन सदस्यांनी पुणे-पंढरपूर-पुणे हे ४१७ किलोमीटरचे अंतर दोन दिवसात पूर्ण केले. सत्यन शहा यांची पत्नी मानसी शहा यांनीही एका दिवसात २१० किलोमीटर अंतर कापत स्त्रियांना तंदुरुस्तीचा संदेश दिला. या सदस्यांमध्ये महेंद्र शहा (वय ६१) या सर्वात मोठे व रुमित गांधी (वय २०) या सर्वात लहान सदस्याचा समावेश होता. उपक्रमाची संकल्पना व आयोजन सागर शहा, देवांग शहा, सुहास मेहता, मनोज शहा व सत्यन शहा यांचे होते.

नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन
पुणे ः सोशल अवेअरनेस कमिटी, नांदेड सिटी आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेटर यांच्यातर्फे नुकतेच नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी (ता. १०) सकाळी आठ वाजता सारंग सोसायटी येथून रॅलीला सुरुवात झाली. शुभकल्याण क्लब हाऊस येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी सुमारे दीडशे व्यक्तींनी नेत्रदान करण्याचा संकल्प करत नेत्रदान प्रतिज्ञापत्र भरले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिल दुधभाते, डॉ. शिरीष पाटील, शंकर इंगवले, नरसिंग लगड, सुधीर काळकर, सुजित कारेने, प्रताप पाटील आदींनी परिश्रम घेतले.

चारुशीला बेलसरे यांचा ‘रंग भक्तीचे’ कार्यक्रम संपन्न
पुणे ः आषाढी एकादशीनिमित्त गायिका चारुशीला बेलसरे यांचा ‘रंग भक्तीचे’ हा कार्यक्रम नुकताच सादर झाला. दत्तवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरात लायन्स क्लब मित्रमंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बेलसरे यांनी ‘मन हे राम रंगी रंगले’, ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, ‘पायो जी मैंने रामरतन धन पायो’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘जग में सुंदर है दो नाम’, ‘थकले रे नंदलाला’ आदी गीते सादर केली. ‘कानडा राजा पंढरीचा’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. विठ्ठलाच्या गजर करत कार्यक्रमाची सांगता झाली. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी या कार्यक्रमाचे निरूपण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27003 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top