खिळे असलेल्या चाबकाच्या पट्ट्यांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खिळे असलेल्या चाबकाच्या पट्ट्यांचे प्रदर्शन
खिळे असलेल्या चाबकाच्या पट्ट्यांचे प्रदर्शन

खिळे असलेल्या चाबकाच्या पट्ट्यांचे प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : पर्यटनाच्या ठिकाणी खिळे असलेल्या चाबकांच्या पट्टेद्वारे घोड्यासह इतर प्राण्यांना नियंत्रित केले जाते. मात्र, या पट्ट्यांचा वापर बेकायदेशीर आहे. त्यामुळे जप्त केलेल्या या पट्ट्यांचे प्रदर्शन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता भरविण्यात येणार आहे. त्यात १०० पेक्षा जास्त चाबूक ठेवले जाणार आहेत.

प्रदर्शनात ठेवण्यात येणारे चाबूक ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) देश व राज्यातील पोलिसांनी विविध भागातून जप्त केलेले आहेत. मुद्दामहून प्राण्याच्या तोंडात खुपसले जाणारे पट्टे कोल्हापूर, महाबळेश्वर, माथेरान आणि पाचगणी येथील घोडेमालकांकडून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत पेटाच्या ॲडव्होकसी असोसिएट नताशा इत्तियेराह यांनी सांगितले की, ‘‘हे पट्टे घोड्यांवर मानसिक आघात करतात. त्यामुळे प्राण्यांना इजा न पोचवता प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी. लग्न किंवा इतर समारंभात घोड्याचा वापर करू नये, असे आवाहन आम्ही पर्यटकांना करीत आहोत.’’

उत्पादनास आणि विक्रीस मनाई
चाबकाच्या पट्ट्याच्या वापरण्यावरील बंदीची अंमलबजावणी करण्यास पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने पेटाने एक देशव्यापी
मोहीम सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाने एक परिपत्रक जारी केले आणि जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना या बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. पेटाद्वारे राज्याच्या मुख्य सचिवांना खिळे असलेल्या चाबकाच्या पट्ट्याच्या उत्पादनास आणि विक्रीस मनाई करण्यासाठी नियम अधिसूचित करण्याची विनंती केली आहे. आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगण आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुद्धा ही बंदी लागू होणे अनिवार्य करण्याचे आदेश जारी केले आहेत. असे ही नताशा यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27021 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..