पुणे महापालिका : पाटबंधारे विभागाकडून दारत वाढ पाणीपट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिका : पाटबंधारे विभागाकडून दारत वाढ 
पाणीपट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार
पुणे महापालिका : पाटबंधारे विभागाकडून दारत वाढ पाणीपट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार

पुणे महापालिका : पाटबंधारे विभागाकडून दारत वाढ पाणीपट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : शहराच्या मागणीनुसार वाढीव पाणी कोटा अद्याप राज्य सरकारने मंजूर केला नाही. परंतु, पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी वाढवली जात आहे. आता महापालिकेला पाणीपट्टीसाठी वर्षाकाठी ८० कोटी रुपयांऐवजी २०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे १२० कोटी रुपयांनी वाढलेला हा खर्च पुणेकरांच्या करातूनच वसूल केला जाणार आहे.

शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, भामा आसखेड या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत केलेल्या करारानुसार ११.५० टीएमसी पाणी कोटा शहरासाठी मंजूर केला आहे. त्यासाठी प्रतिवर्षी महापालिकेला ७५ ते ८० कोटी रुपये पाटबंधारे विभागाला द्यावे लागतात. पाटबंधारे विभागाने आता नवे दर लागू केले आहेत. १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

असा झाला बदल
महापालिकेला पूर्वी घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी घेतल्यास प्रति हजार लिटरला ३० पैसे दर होता आणि कालव्यातून पाणी घेतल्यास प्रती हजार लिटरला ५५ पैसे दर होता. आता जलवाहिनीसाठी प्रती हजार लिटरला ५५ पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रति हजार लिटरला १. १० रुपये इतका दर आकारला जाणार आहे. औद्योगिक वापरासाठी थेट धरणातून पाणी उचलणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रति हजार लिटर ४.८० रुपये ऐवजी ११ रुपये द्यावे लागणार आहेत. कच्चा माल उद्योगांना प्रति हजार लिटर १२० रुपये ऐवजी १६५ रुपये द्यावे लागतील. कालव्यातून पाणी उचलणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रति हजार लिटर ९.६० रुपये ऐवजी २२ रुपये, कच्चा माल उद्योगांना प्रतिहजार लिटर २४० रुपये ऐवजी ३३० दर आकारण्यात येणार आहेत.


पुणे शहरासाठी ११.५० टीएमसीचा पाणी कोटा मंजूर आहे. त्यासाठी महापालिका पाटबंधारे विभागाला दरवर्षी सुमारे ८० कोटी रुपये शुल्क देत आहे. पण आता दर दुप्पटीने वाढवले आहे. तसेच इतर काही शुल्कातही मोठी वाढ केल्याने वर्षाचा हा खर्च किमान २०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
-अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27073 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..