कारागृहातून बाहेर पडलेले दोन कैदी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृहातून बाहेर पडलेले दोन कैदी फरार
कारागृहातून बाहेर पडलेले दोन कैदी फरार

कारागृहातून बाहेर पडलेले दोन कैदी फरार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः येरवडा कारागृहातून पॅरोल रजा (अभिवचन रजा) मंजूर करून बाहेर आलेले दोन कैदी फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. रजेचा कालावधी संपल्यानंतरही दोघे जण कारागृहात न परतल्याने त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
शाहबाझ ऊर्फ चिच्या सादिक बागवान (वय ५२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) व गौरव राजकुमार शर्मा (रा. गोकुळनगर, कोंढवा बुद्रूक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कारागृहातील रक्षक संदीप भोसले यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान याला लष्कर ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला ४५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. रजेचा कालावधी संपल्यानंतरही तो कारागृहात परतला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शर्मा याला लष्कर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दीड वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याला ४५ दिवसांची रजा मंजूर केली होती. त्यानंतरही तो कारागृहात परतला नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27077 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..