
इंदूताई पाटणकर पुरस्कार लता भिसे- सोनावणे यांना जाहीर
पुणे, ता. ११ : क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांच्या नावाने दिला जाणारा यंदाचा पुरस्कार हा भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य सचिव, स्त्रियांच्या चळवळीत काम करणाऱ्या पुण्यातील कॉ. लता भिसे- सोनावणे यांना जाहीर झाला आहे.
येत्या १४ जुलै रोजी क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांच्या पाचव्या स्मृती दिनादिवशी श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल डांगरे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते कासेगाव येथे वितरण होणार आहे.
हा पुरस्कार दरवर्षी एका स्त्री कार्यकर्तीला दिला जातो. यापूर्वी कॉ. नजूबाई गावित, कॉ. ठगीबाई वसावे, डॉ. कुंदा प्रमिला नीलकंठ आणि कॉ. निशा शिवूरकर यांना देण्यात आले आहेत. रोख रक्कम, शाल, आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, स्त्रियांच्या चळवळीत भरीव काम करणाऱ्या स्त्री कार्यकर्तीला देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने पहिला पुरस्कार जाहीर करतानाच घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार जाहीर केल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27088 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..