तुमची ताकद मला द्या; परत जोमाने उभे राहू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमची ताकद मला द्या; परत जोमाने उभे राहू
तुमची ताकद मला द्या; परत जोमाने उभे राहू

तुमची ताकद मला द्या; परत जोमाने उभे राहू

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : ‘‘आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु तुमची ताकद मला हवी आहे. सध्या आपणास ‘विदाऊट तिकीट’ प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल, तर सोबत राहा. शिवसेनेला संपविण्याचा भाजपचा डाव आहे,’’ असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक ‘मातोश्री’ येथे झाली. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना भाजपसह शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘हिंमत असेल, तर मुदतपूर्व निवडणूक घेऊन दाखवा’, असे आव्हानही दिले. राज्यात घटनेची पायमल्ली करून कारभार कसा सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना, दुसरीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावरही त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणार असून अरुणाचल प्रदेशसारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, खा. अरविंद सावंत, पुणे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहीर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

PNE22S77219

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27095 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top