स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर
स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर

स्तनाच्या कर्करोगाबाबतचा शोधनिबंध सादर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या दीपशिखा सिंग या विद्यार्थिनीने आणि जैव तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. राजेश गच्चे यांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला. या शोधनिंबधात स्तनाच्या कर्करोगाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे सादर करण्यात आली.
‘ड्रग रेजिस्टंट अपडेट’ या जागतिक नियतकालिकामध्ये त्यांचा हा शोधनिबंध सादर झाला आहे. २२.८४ इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या उत्तम नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करणारी दीपशिखा विद्यापीठातील पहिली विद्यार्थ्यांनी ठरली असल्याचे डॉ. राजेश गच्चे यांनी सांगितले.
डॉ. गच्चे म्हणाले,‘‘जागतिक कर्करोगांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा क्रमांक एकवर होता. मात्र अलीकडच्या काळात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून स्तनाचा कर्करोग एक क्रमांकावर आल्याचे पाहायला मिळते. स्तनाच्या कर्करोगावर उपलब्ध असलेल्या औषधोपचार पद्धतीला अनेक कारणांमुळे सध्या प्रतिबंध केला जात आहे. त्यापैकी ‘लॉग नॉन कोडिंग आर एन ए’ या एका प्रमुख कारणामुळे या उपचारपद्धती आज स्तनाच्या कर्करोगावर निष्प्रभ असल्याचे या संशोधनात दिसून आले आहे. शोधनिबंधात या विषयावरील शास्त्रीय तथ्ये मांडली आहेत.’’
डॉ. गच्चे यांच्या प्रयोगशाळेत या समस्येवर मूलभूत संशोधन सुरू आहे. यासाठी ‘एसईआरबी डीएसटी’ दिल्ली या संस्थेने अर्थसाहाय्य दिले आहे. तसेच डॉ. गच्चे यांना नुकतेच लंडन येथील रॉयल सोसायटी ऑफ मेडीसिन यांनी मानद सदस्यत्व बहाल केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27201 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..