पत्रसंवादातून उलगडले निखळ मैत्रीचे भावबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रसंवादातून उलगडले निखळ मैत्रीचे भावबंध
पत्रसंवादातून उलगडले निखळ मैत्रीचे भावबंध

पत्रसंवादातून उलगडले निखळ मैत्रीचे भावबंध

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : गुढरम्यता आणि स्पष्टवक्तेपणा, अशी ओळख असलेल्या दोन व्यक्तींमधील प्रतिभेचा भावाविष्कार व्यक्त करणाऱ्या पत्रसंवादातून निखळ मैत्रीच्या भावबंधाचे दर्शन सोमवारी (ता. १२) रसिकांना झाले. निमित्त होते आरभाट फिल्म निर्मित सुनीताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांवर आधारित अभिवाचनाचा ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ या कार्यक्रमाचे.
जी. ए. कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यातर्फे आयोजित जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळ्यात हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात लेखिका माधुरी पुरंदरे आणि अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी यांनी जीए आणि सुनीताबाईंच्या पत्रांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे संकलन आणि दिग्दर्शन उमेश कुलकर्णी यांचे होते. बिभुती भूषण बंदोपाध्याय यांच्या ‘अरण्यक’च्या निमित्ताने त्यांनी एकमेकांशी पत्राव्दारे साधलेला संवाद, काही व्यक्तिगत पण सामाजिक जीवनाशी निगडीत असलेल्या विषयांवर केलेले भाष्य, महात्मा गांधी, बा. भ. बोरकर, चिं. त्र्यं. खानोलकर, टी. एस. एलियट अशा प्रतिभावंतांच्या आणि विचारवंतांच्या जीवनसाधनेवर त्यांनी मांडलेला स्थितीवाद रसिकांना समृद्ध करणारा ठरला. या पत्रांमधील त्यांचा व्यक्तिगत संवाद, विविध पदार्थांचे उल्लेख, प्रवासातील अनुभव, वैयक्तिक आवडीनिवडी आदींचा प्रतिबिंब नेमक्या अभिवाचनातून व्यक्त झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27257 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..