एपीजी-एसआयआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीजी-एसआयआयएलसी
एपीजी-एसआयआयएलसी

एपीजी-एसआयआयएलसी

sakal_logo
By

बिझनेस अकाउंटिंग फ्री वेबिनार

पुणे, ता. १२ : अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर संधींविषयी माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. १७) सकाळी साडेदहा वाजता आयोजित केला आहे. बीकॉम, बीबीए, बीए, बीएस्सी अशा विविध प्रवाहांतील विद्यार्थ्यांसाठी अकाउंटिंग क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अकाउंटिंग क्षेत्रातील वाढत्या मागणीला योग्य कौशल्यांसह सामोरे जाण्याचे मार्ग कोणते? याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाविद्यालयीन जीवनातच रोजगारक्षम प्रशिक्षण घेऊन ‘जॉब रेडी’ होण्याचे मार्ग सांगितले जातील.

संपर्क : ७३५०००१६०२.


विमान वाहतूक उद्योगातील करिअर संधी

पुणे, ता. १२ : भारतात विमान वाहतूक उद्योगाची जोरदार भरभराट होत आहे. मात्र त्यात फ्लाइट केबिन क्रू, एअरलाइन तिकीट व्यवस्था, ग्राउंड स्टाफ यातील तज्ज्ञ मनुष्यबळाची नेहमी कमतरता भासते. ही उणीव भरून काढण्यासाठी व या उद्योगाची गरज ओळखून तयार करण्यात आलेला खास अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. जगभर फिरण्याची संधी देणारे हे आव्हानात्मक करिअर आहे. एका वर्षाच्या या कोर्समध्ये सुरुवातीला विशेष प्रात्यक्षिकांसह सहा महिन्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतरच्या सहा महिन्यांत सशुल्क इंटर्नशिप दिली जाईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट साहाय्य पुरवले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेले १७ ते २५ या वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील.

या संदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. १७) आयोजित केला आहे. यामध्ये सहभागी होऊन भारतात जोमाने वाढणाऱ्या विमान उद्योग क्षेत्रातील करिअर संधींविषयी जाणून घेता येईल. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६६९६८९०१५.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27317 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..