
जेईई मेन परीक्षेत ‘एलन’चे यश ३८ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल
पुणे, ता. १२ : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ‘एलन करिअर इन्स्टिट्यूट’च्या पुण्यातील आठ विद्यार्थ्यांना ९९.९ पर्सेंटाईलपेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळाले आहेत. तर ३८ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहेत.
देश पातळीवरील निकालात संस्थेच्या विश्वजीत जाधव याने ९९.९८ पर्सेंटाइल, तर स्नेहा पारिक हिने १०० पर्सेंटाईल मिळविले. अद्वई कृष्णा याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळवून महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकाविले आहे. जान्हवी रॉय हिने संस्थेच्या क्लासरूम स्टुडंट मुलींच्या गटात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
‘एलन पुणे’चे केंद्र प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘९९ पर्सेंटाइलच्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत मुख्य शाखेत प्रवेश मिळू शकतो. ९९ ते ९८ पर्सेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘टॉप’च्या १० ‘एनआयटी’च्या मुख्य शाखांव्यतिरिक्त उर्वरित टॉप १०-२० एनआयटी आणि ट्रिपल आयटीमध्ये इतर शाखांसह कोअर शाखा मिळण्याची शक्यता आहे.’’
ते म्हणाले, ‘‘यावर्षी जेईई-मेन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय आहेत. जूनच्या जेईई-मेनचे पर्सेंटाइल ९९.५ पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांनी जेईई-अॅडव्हान्सची तयारी करावी. कारण या पर्सेंटाइलवर चांगल्या ‘एनआयटी’मध्ये कोअर शाखा घेण्याचा पर्याय आहे. ९९.५ ते ९८.५ पर्सेंटाईल असलेले विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार जेईई-मेनसाठी बसू शकतात किंवा त्यांनी जेईई-अॅडव्हान्ससाठी तयारी करावी. तर ९८.५ पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईल असणाऱ्यांनी जेईई-मेन आणि जेईई ॲडव्हान्सच्या तयारीकडे लक्ष द्यावे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27331 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..