जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगीत
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगीत

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगीत

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेमध्ये राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत कार्यक्रमास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27389 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..