शिवसेनेच्या खासदारांचा भाजपसोबत राहण्याचा आग्रह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या खासदारांचा 
भाजपसोबत राहण्याचा आग्रह
शिवसेनेच्या खासदारांचा भाजपसोबत राहण्याचा आग्रह

शिवसेनेच्या खासदारांचा भाजपसोबत राहण्याचा आग्रह

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : ‘‘शिवसेनेने भाजपसोबत राहावे, असा आग्रह शिवसेना खासदार संजय राऊत वगळता लोकसभेतील शिवसेनेच्या १८ पैकी १६ व राज्यसभेतील दोन खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता,’’ अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. भाजपसोबतचे संबंध ताणले जाऊ नयेत, यासाठी राष्ट्रपतीपदाच्या ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे शिवसेनेच्या एका खासदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी (ता. ११) ‘मातोश्री’ येथे बैठक झाली. यावेळी पाच खासदार अनुपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या खासदार भावना गवळी व श्रीकांत शिंदे यांच्या व्यतिरिक्त उर्वरित लोकसभा व राज्यसभेतील खासदारांपैकी एकमेव संजय राऊत वगळता सर्वच खासदारांची भाजपबरोबर राहण्याची प्रबळ इच्छा आहे, असे या खासदाराने म्हटले आहे.

भाजपसोबत भवितव्य...
भाजपसोबत राहिल्यानेच आपण निवडून आल्याचे बहुतांश शिवसेनेच्या खासदारांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे भविष्यातही भाजपसोबत राजकीय भवितव्य आहे. आपण राष्ट्रवादी कॉँग्रेससोबर राहू नये, त्यांना केंद्रातील राजकारणाशी देणे-घेणे नाही. ते केव्हाही भाजपसोबत जुळवून घेतात. परिणामी आपले हित भाजपसोबत राहण्यातच आहे. त्यामुळे खासदारांच्या आग्रहास्तव राष्ट्रपतीपदाच्या ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27421 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top