ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पावसामुळे ओली झालेली दुकानाची भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एक कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील हमजेखान चौकाजवळ घडली.

लक्ष्मण रामचंद्र माळी (वय ५५, रा. शनिमंदिराजवळ, शनिवार पेठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेशपेठेतील हमजेखान चौकाजवळ बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाच्या जवळच गॅलॅक्‍सी नावाचे कपड्याचे दुकान आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संबंधित दुकानातील साहित्य बाहेर काढण्याचे काम लक्ष्मण माळी हे करीत होते. त्यावेळी पावसामुळे ओली झालेली भिंत कोसळली. त्यामुळे माळी हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेची माहिती स्थानिक नागरीकांनी तत्काळ अग्निशामक दलास दिली. काही वेळातच तेथे दाखल झालेल्या अग्निशामक दलाचे जवान संजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मातीचा ढिगारा बाजूला करून माळी यांना बाहेर काढले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
---------
फोटो नं - ७७४८४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27441 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..