विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

गुणवंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, ता. १३ ः भातृमंडळ या संस्थेतर्फे १५ ऑगस्टला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. त्याकरिता पूर्व माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्रज्ञाशोध, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, पदवी, पदविका,पदव्युत्तर, स्पर्धा, पदव्युत्तर संशोधन इत्यादी परिक्षांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन भातृमंडळतर्फे करण्यात आले. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका किंवा योग्य त्या प्रमाणपत्राची प्रत आपल्या पालकांच्या संक्षिप्त माहितीसह संपूर्ण पत्ता, संपर्क ई-मेल द्वारे bhratrumandal@gmail.com संस्थेला पाठवावा, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत नेमाडे यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27614 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..