कामगाराचे मारहाण करून अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगाराचे मारहाण करून अपहरण
कामगाराचे मारहाण करून अपहरण

कामगाराचे मारहाण करून अपहरण

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल मागितल्याच्या रागातून टोळक्‍याने हॉटेलच्या कामगारास जबर मारहाण करून त्याचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींचा माग काढत पाच जणांना अटक केली. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर मंगळवारी रात्री घडली.

योगेश सर्जेराव पार (वय २८, रा. नगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रूपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२), नितीन अशोक वाडेकर (वय ३२, रा. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किशोर कोईराला असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी शारदा नीलेश भिलारे (वय ३८, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भिलारे यांचे मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमळा नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या हॉटेलमध्ये पार, कानडे, वाडेकर, बेंद्रे जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी जेवण केल्यानंतर किशोर याने त्यांना जेवणाचे बिल मागितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यास बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी भिलारे यांनी धमकावले. ‘‘उद्या तुम्ही याच्या मरणाची खबर ऐकाल,’’ अशी धमकी देत त्यांनी कोईरालाला आपल्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यास आणखी मारहाण करून काही अंतरावर सोडून देत आरोपी पसार झाले. या घटनेबाबत भिलारे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27683 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..