राज्यात आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
राज्यात आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

राज्यात आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः राज्यात मॉन्सूनच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून अवघ्या आठवड्यात राज्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस गाठला आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत आहे.
एकीकडे जून महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यात सरासरीही गाठली नव्हती. दरम्यान जुलै महिन्यात राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दीर्घकालीन अंदाजात दिला होता. त्यानुसार जुलैमध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळत असून राज्यात पावसाने सरासरी गाठली आहे. १ जून ते १४ जुलै या कालावधीत राज्यात साधारणपणे ३५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते. मात्र, यंदा या कालावधीत ५०३.२ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला असून हा सरासरीपेक्षा ४४ टक्के जास्त आहे. राज्याच्या चार विभागांची स्थिती पाहता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यामध्ये मराठवाड्याने बाजी मारली असून मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल ८७ टक्के जास्त पाऊस नोंदला गेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी अद्याप सांगलीमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
मागील आठवड्यापासून मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कायम आहे. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रस्ते खचले. सध्या कोकणातील प्रमुख नद्यांना पूर तर विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे घाट माथ्यावरही दरडी कोसळण्याच्या घटना, रस्ते खचले असून धरणांच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कायम आहेत.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त ः
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे ६० टक्के जास्त पाऊस पडला आहे. शहरातही पावसाने सरासरी गाठली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्याला हुलकावणी दिलेल्या पावसामुळे खरीप पेरणीवरही याचा परिणाम झाला. जिल्ह्याने सरासरीही गाठली नव्हती. मात्र, आठ ते दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात झाला.

जिल्ह्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (जून ते १४ जुलैपर्यंत)
सरासरी ः प्रत्यक्षात ः टक्केवारी
३२२.९ ः ५१२.३ ः ५९ टक्के जास्त

राज्यातील विभागनिहाय पावसाची नोंद (१ जून ते १४ जुलैपर्यंत मिलिमीटरमध्ये) ः
विभाग ः सरासरी ः प्रत्यक्षात ः टक्केवारी
मध्य महाराष्ट्र ः ३६१.९ ः २५७.५ ः ४१
कोकण ः १५३१.१ ः ११६३.२ ः ३२

मराठवाडा ः ३८७.४ ः २०७.२ ः ८७
विदर्भ ः ४४१ ः ३०७.२ ः ४४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27984 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..