जिल्ह्यात आणीबाणी पेन्शनचे ५३३ लाभार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आणीबाणी पेन्शनचे ५३३ लाभार्थी
जिल्ह्यात आणीबाणी पेन्शनचे ५३३ लाभार्थी

जिल्ह्यात आणीबाणी पेन्शनचे ५३३ लाभार्थी

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : राज्यात सत्तांतर होताच आणीबाणीच्या वेळेस कारावास सोसलेल्यांना पुन्हा पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा पुणे जिल्हयातील ५३३ लोकांना लाभ मिळणार आहे.

देशात २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत आणिबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याचा प्रस्ताव २ जानेवारी २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात सुरू केलेली ही योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या महसुलात घट झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे कारण देत महाविकास आघाडीने ३१ जुलै २०२० मध्ये ही योजना बंद केली. त्यामुळे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणे बंद झाले.

दरम्यान नुकताच राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना बंडखोरांच्या मदतीने भाजप पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू होणार कि नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गुरूवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आणीबाणीच्या काळातील बंदीवासांना पुन्हा पेन्शन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणे जिल्हयातील तब्बल ५३३ जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्‍चात पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्‍चात पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.


अर्जासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्‍टोबर २०२२ इतकी राहणार आहे. यासाठी आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी ३ जुलै, २०१८ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्‍यक राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28096 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..