शहरातील शाळा आज राहणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील शाळा आज राहणार सुरू
शहरातील शाळा आज राहणार सुरू

शहरातील शाळा आज राहणार सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः शहरातील सर्व बोर्डाच्या शाळा उद्यापासून (ता. १५) सुरू राहणार आहेत, असे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरातील अनेक शाळांनी शाळा थेट सोमवारी उघडतील, असे संदेश पालकांना पाठवून दिले आहेत.

पुणे शहर व परिसरात अतिवृष्टी होणार असल्याने आज (ता. १४) शाळेला सुट्टी देण्यात आली. आज दिवसभरात शहर व परिसरात साधारण पाऊस झाला, त्यामुळे पुणे महापालिकेने शुक्रवारी शाळा सुरू राहतील, असे आदेश काढले आहेत.

अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे शाळांना केवळ आजच्या दिवसपुरतीच सुट्टी होती. शुक्रवारी पुणे शहरातील सर्व बोर्डाच्या शाळा सुरू राहतील, त्यांना सुट्टी देण्यात आलेली नाही.’’
-------------------
शाळा बंदचे पालकांना मेसेज
पुणे महापालिकेकडून शुक्रवारी शाळा सुरू राहणार की बंद ठेवणार, याचा निर्णय लवकर होणे अपेक्षीत होते. मात्र, शाळा सुरू राहतील हे कळविण्यास सायंकाळ झाली, पण शहरातील बहुतांश शाळांनी दुपारीच पालकांना शुक्रवारी शाळेला सुट्टी आहे, असे मेसेज टाकून दिले. त्यामुळे उद्या महापालिकेच्या स्वतःच्या शाळा वगळता इतर शाळा बंदच राहणार, अशी शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28115 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..