विमानांच्या उड्डाणांवर पावसाने फेरले ‘पाणी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानांच्या उड्डाणांवर पावसाने फेरले ‘पाणी’
विमानांच्या उड्डाणांवर पावसाने फेरले ‘पाणी’

विमानांच्या उड्डाणांवर पावसाने फेरले ‘पाणी’

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पावसाचा पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. ज्याप्रमाणे रस्ते वाहतूक खोळंबल्याने पुणेकरांना मोठा फटका बसत आहे. त्याप्रमाणे हवाई वाहतुकीलादेखील मोठा फटका बसला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत पुणे विमानतळावरून होणाऱ्या विमानांचे उड्डाण कमी झाले आहे. रोज काही विमाने रद्द होत आहेत. तर दिल्ली, चेन्नईला जाणाऱ्या विमानांना दोन ते तीन तासांचा उशीर होत आहे. पावसामुळे विमान वाहतुकीचे वेळापत्रकच कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत पुणे व परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. शिवाय देशांत अन्य ठिकाणीदेखील पावसाचे थैमान सुरू आहे. मोठ्या पावसामुळे विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी झाली आहे. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळी दृश्यमानतेत घट होत असल्याने विमानांना लँडिंगच्या वेळी अडचण निर्माण होत आहे. परिणामी विमाने रद्द तसेच उड्डाणांना उशीर होत आहे. याचा सर्वाधिक फटका कनेक्टिंग विमानांच्या प्रवाशांना बसत आहे. एकीकडे उशीर झाला, तर दुसरी फ्लाइट चुकत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. दिल्लीला जाणाऱ्या तसेच बेंगळुरू, चेन्नई, चंडीगड व लखनौ आदी ठिकाणी जाणाऱ्या विमानांना उशीर होत आहे.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28123 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..