
पुणे जिल्ह्यातील खरीप पेरण्या, पावसाचा आढावा
- जून महिन्यातील पाऊस ः ४७.२ टक्के
- जून ते १४ जुलैअखेर पाऊस ः १०७ टक्के
- जिल्ह्यात खरीप पेरण्या ः ३७ टक्के
- वरंधा घाटातील पुणे-भोर-महाड महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद.
- पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
- आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खुर्द ते कुशिरे बुद्रूक दरम्यान रस्ता खचला. हा रस्ता वाहतुकीस बंद.
- आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव बस थांब्याजवळील जुन्या पुलावरून वाहतूक बंद. नवीन पूल वाहतुकीस खुला.
- अतिवृष्टीमुळे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर तालुके वगळून इतर सर्व तालुक्यांतील बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालयांना शनिवार (ता. १६) पर्यंत सुटी जाहीर.
- हवेली तालुक्यातील नांदेड-शिवणे पुलावरून दोन तरुण वाहून गेले होते. त्यापैकी निखिल नीरजकुमार कौशिक (रा. नांदेड सिटी, मूळ रा. गाझियाबाद) याचा मृतदेह दांगट पाटील नगर परिसरात आढळला.
- मुळशी, पौड, कोळवण, काशिगमार्गे पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हाडशी तलावाजवळ भेगा, वाहतूक बंद.
- गड, किल्ले, पर्यटनस्थळावर गिर्यारोहक, पर्यटकांना बंदी.
- जुन्नरजवळ बोरी खुर्द येथे तीन मेंढ्या आणि एका शेळीचा मृत्यू.
- कोपरे पुताचीवाडी येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू.
- मुळशी तालुक्यात कोळवली येथे दोन गाई आणि वासराचा मृत्यू.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28134 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..