‘गुरुतत्त्व’ ॲपचे ऑनलाइन अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गुरुतत्त्व’ ॲपचे ऑनलाइन अनावरण
‘गुरुतत्त्व’ ॲपचे ऑनलाइन अनावरण

‘गुरुतत्त्व’ ॲपचे ऑनलाइन अनावरण

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : समर्पण ध्यानयोगचे प्रणेते श्री शिवकृपानंदजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या ‘गुरुतत्त्व’ मंचाच्या वतीने तीनदिवसीय ऑनलाइन गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. ७२ तासांच्या या ऑनलाइन कार्यक्रमात देश-विदेशातून हजारो साधक उत्साहाने सहभागी झाले. महोत्सवाच्या अंतिम दिवशी गुरु माँनी समर्पण परिवाराची द्वैमासिक अंक ‘मधुचैतन्य’चा १००वा अंक आणि ‘गुरुतत्त्व’ ॲपचे अनावरण केले.
शिवकृपानंद स्वामींचे अमूल्य आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ध्यानसत्राने या आध्यात्मिक महोत्सवाचा ११ जुलैला प्रारंभ झाला. यानंतर शिवकृपानंद स्वामी आणि गुरु माँ यांच्या यजमानपदाने पार पडलेल्या हवनाबरोबर साधकांनी घरी यज्ञ करून वातावरण ऊर्जामय केले. तसेच, प्रवचनाच्या माध्यमातून साधकांनी आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त केले.
शिवकृपानंद स्वामी म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीमधे गुरूला परमात्मा मानण्यात आले आहे. साक्षात परमात्मा जर कोणी असेल तर तो गुरू आहे. गुरूच्या माध्यमातून चैतन्य वाहत असते. गुरू बघण्याची गोष्ट नाही आहे, ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. ’’
गुरुपौर्णिमेच्या सकाळी त्यांनी नवीन साधकांना ऑनलाइन गुरुदीक्षा दिली. प्रत्येक दिवशी योग सत्र, गुरुतत्त्वविषयी जागरूकता आणणारे ‘गुरुकथा’ सत्र, जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठीचे उपाय शिकवणारे ‘कि टू स्ट्रेस लिविंग’, ‘अनुभूती कथन’ हे महोत्सवाचे आकर्षण होते. महोत्सवाच्या आयोजनासाठी अंबरीष यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणाऱ्या गुरुतत्त्व टीमचे साधकांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28185 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top