
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
पुणे, ता. १५ ः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते दहावीच्या गरजू व निवडक ३२० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सकाळ सोशल फाउंडेशन, लोहिया प्रतिष्ठान व संलग्न इतर ट्रस्ट आणि के अँड क्यू परिवार यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप बुधवार पेठ येथील ‘सकाळ’ कार्यालयात करण्यात आले.
यावेळी लोहिया प्रतिष्ठानचे विश्वस्त आदित्य लोहिया, शरद सारडा, के अँड क्यू परिवारचे मनोज मुछाल, सकाळ सोशल फाउंडेशनचे विश्वस्त महेंद्र पिसाळ आणि शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून ‘सकाळ’ प्रतिनिधींमार्फत गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
याप्रसंगी महेंद्र पिसाळ यांनी सकाळ सोशल फाउंडेशन, सकाळ रिलिफ फंड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच, यावेळी ‘सकाळ’ मार्फत अनेक समाजविधायक उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. अशा उपक्रमांमध्ये लोहिया प्रतिष्ठान सहकार्य करत आहे व यापुढेही सहकार्य राहील तसेच, समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी अशा उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे, असे मत शरद सारडा यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक साहित्य किटचे स्वरूप
स्कूल बॅग, वह्या, कंपास बॉक्स, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स, बूट व सॉक्स, रेनकोट, स्वेटर, स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स गणवेश (टी शर्ट व हाफ पॅन्ट) सतरंजी व चादर.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28267 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..