
तथाकथित सायबर तज्ज्ञ पंकज घोडेचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे, ता. १५ : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला तथाकथित सायबर तज्ज्ञ पंकज घोडेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेल्या घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. एप्रिल २०१८ पासून २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. घोडे हा दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पोलिसांना तांत्रिक तज्ञ म्हणून तपासास साहाय्य करत होता. यावेळी, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याकडे विश्वासाने दिलेल्या डेटाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून तांत्रिक अहवालाचे बनावटीकरण केले. त्याद्वारे, त्याने शासन व गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची क्रीप्टो करन्सी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला. सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी त्यास विरोध केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28388 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..