ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे तिघांना मिळाले नवजीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे 
तिघांना मिळाले नवजीवन
ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे तिघांना मिळाले नवजीवन

ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे तिघांना मिळाले नवजीवन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : अपघातामुळे मेंदू मृत (ब्रेनडेड) झालेल्या दोन रुग्णांच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळाले. अवघ्या सात तासांमध्ये पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र यांच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे अवयवाचे प्रत्यारोपण केले. यामध्ये ६१ वर्षीय महिला तर ६३ वर्षीय पुरुष रुग्णास यकृत तसेच ४० वर्षीय पुरुष रुग्णास मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.
सोलापूर येथील रुग्णालयात ५६ वर्षीय रुग्ण रास्ता अपघातात गंभीररीत्या जखमी झाले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित केले होते. तसेच पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात २५ वर्षीय तरुणाला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला ब्रेन डेड म्हणून घोषित केले होते. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार या दोन्ही रुग्णाच्या कुटुंबीयांना अवयवदानाविषयी अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दोन्ही रुग्णांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
अवयवदात्याच्या नातेवाइकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या तिन्ही रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत झाली. अवयव ग्रीन कॉरिडॉरद्वारे सोलापुरातून पिंपरीपर्यंत आणण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. शरणकुमार नरुटे, डॉ. आदित्य दाते, डॉ. मनोज डोंगरे, गॅस्ट्रो सर्जन डॉ. विद्याचंद गांधी, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. तुषार दिघे, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. व्ही. पी. साबळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता, कॉर्पोरेट विभागाचे संचालक, वैद्यकीय अधीक्षक यांचे अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत मोलाचे योगदान लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28396 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..