दंडावर सवलत मिळविण्यासाठी उरले १५ दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंडावर सवलत मिळविण्यासाठी उरले  १५ दिवस
दंडावर सवलत मिळविण्यासाठी उरले १५ दिवस

दंडावर सवलत मिळविण्यासाठी उरले १५ दिवस

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : मुद्रांक शुल्काच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवर ९० टक्के सवलत मिळण्यासाठी आता फक्त १५ दिवस राहिले आहेत. त्यानंतर म्हणजे १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत फरकाची रक्कम भरल्यास फक्त ५० टक्केच सवलत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मुदतीमध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाने केले आहे.

जागा, सदनिकांसह विविध प्रकाराच्या खरेदी-व्रिकीचे व्यवहाराचे दस्त करताना मुद्रांक शुल्क आकारले जाते. अनेकदा मोठ्या व्यवहारांमध्ये कमी शुल्काची आकारणी केली जाते. तपासणीनंतर हे लक्षात आल्यानंतर संबंधित नागरीकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून कमी भरलेले शुल्क आकारले जाते. त्यासाठी काही मुदत दिली जाते. त्या मुदतीत भरले नाही, तर दरमहिना दोन टक्के या दराने दंडाची आकारणी केली जाते. अशा अनेक प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम कमी आणि दंडाची रक्कम भरमसाट होते. त्यामुळे नागरिक ती भरण्यास तयार होत नाहीत. काही वेळेस बांधकाम व्यावसायिकाचा दोष असून देखील त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो.
अशा प्रकरणांमुळे दाव्यांची संख्या वाढते. तसेच राज्य सरकारच्या महसूलला देखील फटका पडतो. हे सर्व टाळण्यासाठी दंडाच्या रक्कमेत सवलत देण्याचा निर्णय २५ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत दंडाच्या रकमेवर नव्वद टक्के सवलत मिळणार आहे.

अभय योजनेचा लाभ घ्यावा ः हर्डीकर

नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने अभय योजना सुरू केली आहे. त्यानुसार मुद्रांक शुल्क फरकाची रक्कम ३१ पर्यंत भरल्यास दंडावर ९० टक्के सवलत मिळणार आहे. तर त्यापुढे ३० नोव्हेंबर या कालावधीत फरकाची रक्कम भरल्यास दंडावर ५० टक्के सवलत मिळणार आहे. ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तूट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28431 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top