काश्मीरमधल्या वेदनेची ‘कशीर’ कादंबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मीरमधल्या वेदनेची ‘कशीर’ कादंबरी
काश्मीरमधल्या वेदनेची ‘कशीर’ कादंबरी

काश्मीरमधल्या वेदनेची ‘कशीर’ कादंबरी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः ‘‘काश्मीरमध्ये पर्यटक म्हणून गेल्यावर आलेले अनुभव विदारक होते. तिथल्या सगळ्या अनुभवांचे ओझे हलके व्हावे, या एका विचारातून ‘कशीर’ ही कादंबरी लिहिली. मात्र, हे केवळ अनुभवकथन नसून काश्मीरमधल्या वेदनेतून आकाराला आलेली कादंबरी आहे,’’ असे मत ‘कशीर’ कादंबरीच्या लेखिका सहना विजयकुमार यांनी व्यक्त केले.

‘मेहता पब्लिशिंग हाऊस’, ‘रोटरी क्लब कर्वेनगर पुणे’ आणि ‘अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे’ यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद लेखिकेशी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी या कादंबरीच्या अनुवादिका उमा कुलकर्णी, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष प्रा. श्याम भुर्के, उपाध्यक्ष प्रा. चारुदत्त निमकर, ‘रोटरी क्लब कर्वेनगर’चे अध्यक्ष डॉ. दिलीप कुलकर्णी आणि मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता उपस्थित होते. ‘काश्मीरमधल्या हिंदूंचे एका रात्रीत केले गेलेले निर्गमन आणि पावलोपावली तिथे येणारे अनुभव, ‘कशीर’च्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचवायला फार मोठी मदत झाली आहे. ‘कशीर’ वाचून आलेल्या प्रतिक्रिया, आपण योग्य इतिहास लोकांपर्यंत पोचवत आहोत याचे समाधान देत आहेत’, असे सहना विजयकुमार यांनी सांगितले.

ज्येष्ठ कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांच्या आग्रहावरून या कादंबरीच्या अनुवादाचे काम केले. ते करताना लेखिकेने अतिशय निर्भयतेने उचललेली जोखीम दिसून आली, असे मत अनुवादक कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘लिखाणातला धाडसीपणा, डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सुरू असलेला सहना विजयकुमार यांचा साहित्यिक प्रवास थक्क करणारा आहे’, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28462 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top