
डी.एल.एड परीक्षेचा निकाल जाहीर; ५७.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे, ता. १५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी. एल. एड अभ्यासक्रमाच्या मे २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.१६) रोजी जाहीर केला. परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील सहा हजार ३४१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील ५७.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
डी. एल. एड अभ्यासक्रमासाठी राज्यातील सहा हजार ४५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील सहा हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील तीन हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा पाच माध्यमांमध्ये घेतली. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत पोच मिळणार आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
निकालाची वैशिष्ट्ये :
माध्यम : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी
मराठी : ४,६४७ : ४,५५८ : २,५५९
उर्दू : ८५६ : ८५० : ५४९
हिंदी : १७७ : १७४ : १११
इंग्रजी : ७६३ : ७४३ : ४५९
कन्नड : १६ : १६ : १५
एकूण : ६,४५९ : ६,३४१ : ३,६९३
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28463 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..