
ठेकेदारांची माहिती देण्यास टाळाटाळ
पुणे, ता. १५ ः दोष दायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असलेल्या रस्त्यांची यादी सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी देऊन तीन दिवस उलटून गेले तरीही अद्याप पथ विभागाकडून ही माहिती दिलेली नाही, ही माहिती सादर करण्यास विलंब केला जात आहे. तर शुक्रवार (ता. १५) रोजी शहरातील २०३ खड्डे बुजविले आहेत. यामध्ये सिंहगड रस्ता, कात्रज भागात सर्वाधिक खड्डे असताना तेथे खड्डे बुजविण्याची गतीही जास्त आहे.
शहरात ३१ मार्च २०२२ पूर्वी मोठ्या प्रमाणात रस्ते रिइस्टेटटमेंट करण्याचे कामे केली. त्याचप्रमाणे काही रस्ते नव्याने केली. ठेकेदारांकडून रस्ते दुरुस्तीचे काम केले जात असताना त्याचा दर्जा कायम राहावा, यासाठी दोष दायित्व कालावधी निश्चित केलेला असतो. या कालावधी रस्ते खराब झाल्यास ते पुन्हा ठेकेदाराकडून करून घेतले जातात. शहरातील सर्वच भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. बहुतांश ठिकाणी तर पहिल्याच वर्षात रस्त्यांना खड्डे पडल्याची स्थिती आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी या निकृष्ट पद्धतीने झालेल्या कामाची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची माहिती एका दिवसात सादर करा, असे आदेश दिले होते. प्रत्यक्षात तीन दिवस उलटून गेले तरीही ही माहिती संकलित झालेली नाही. काही कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती आलेली आहे तर काहींकडून आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांची चाळण झालेली असताना महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या कामाला गती आली आहे. महापालिकेने शुक्रवारी दिवसभरात ३४७ खड्ड्यांचे उद्दिष्ट असताना २०३ खड्डे बुजविले आहेत. तर पाणी तुंबणारे १७ ठिकाणे साफ केले आहेत.
शुक्रवारी बुजवलेल्या खड्ड्यांचा तक्ता
हद्द (कार्यकारी अभियंता अनुक्रमांक) - खड्डे बुजविण्याचे लक्ष्य - बुजविलेले खड्डे
सिंहगड रस्ता-कात्रज (१) - ११३ - ७८
कोंढवा-वानवडी (२) - ३५ - ३५
पेठा (३) - ४४ - १९
हडपसर-मुंढवा (४) - ४२ - २३
बाणेर-बालेवाडी(५) - ३१ -१९
कोथरूड-वारजे (६) - ४६ - ७
संपूर्ण नगर रस्ता दोन्ही बाजू (७) - ३६ - २२
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28470 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..