लष्करी अधिकाऱ्यांसाठी विमानतळावर विश्रांतीकक्ष करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लष्करी अधिकाऱ्यांसाठी विमानतळावर विश्रांतीकक्ष करा
लष्करी अधिकाऱ्यांसाठी विमानतळावर विश्रांतीकक्ष करा

लष्करी अधिकाऱ्यांसाठी विमानतळावर विश्रांतीकक्ष करा

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः लोहगाव विमानतळासाठीच्या इमारत विस्तारीकरणात लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तयार करावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी विमानतळ संचालक संतोष ढोक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या विमानतळाचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. पुणे हे लष्कराचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे शहरात लष्कराचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम होतात. यासाठी देशभरातून लष्करी अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच पुणे शहर व जिल्ह्यात येतात. मात्र त्यांना विश्रांतीसाठी कसलीच सोय उपलब्ध नाही. त्यामुळे लष्करासाठी स्वतंत्र व खास विश्रांती कक्ष असणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी ढोक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या मागणीचे पत्र नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना इ-मेलद्वारे पाठविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28483 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..