तरुणीच्या अवयवदानामुळे दोन जवानांना जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army
तरुणीच्या अवयवदानामुळे दोन जवानांना जीवनदान

तरुणीच्या अवयवदानामुळे दोन जवानांना जीवनदान

पुणे : देशसेवेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या लष्करातील दोन जवानांना अवयवदान करत त्यांना जीवनदान दिले आहे. पुण्यातील कमांड रुग्णालयात ब्रेनडेड झालेल्या एक तरुण महिलेच्या अवयवांमुळे जवानांचे प्राण वाचविण्यात लष्करी डॉक्टरांना यश आले आहे. एका दुर्दैवी घटनेमुळे ब्रेनडेड झालेल्या तरुण महिलेला कमांड रुग्णालयात दाखल केले होते. त्या महिलेच्या मेंदूचे कार्य सुरू असल्याची शरीरात कोणतीच लक्षणे दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेला ब्रेनडेड घोषित केले.

मात्र, आपल्या मुलीच्या अवयवांमुळे कोणाची जीव वाचू शकतो, यासाठी तिच्या कुटुंबाने तिच्या अवयवांना दान करण्याचे ठरविले. त्यानुसार महिलेच्या मूत्रपिंडासारखे महत्त्वाचे अवयव लष्करी जवांनाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. ही शस्त्रक्रिया गुरुवारी (ता. १४) आणि शुक्रवारी (ता. १५) झाली. या महिलेचे डोळे कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील नेत्रपेढीत सुरक्षितपणे जतन करून ठेवले आहे. तसेच यकृत रूबी हॉल रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.

कुटुंबाने उचलले निर्णायक पाऊल
मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या अवयवदानाच्या संकल्पनेबाबत त्या महिलेच्या कुटुंबीयांना माहीत होते. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर त्या कुटुंबाने अवयवांची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना तरुण महिलेचे अवयवदान केले जावेत, अशी इच्छा व्‍यक्त केली. त्यांनतर अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी सर्व परवानग्या घेतल्यानंतर कमांड रुग्णालयातील प्रत्यारोपण पथकाने तातडीने पावले उचलली. तसेच विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना याबाबत माहिती देण्यात आली. मरणोत्तर अवयवदानाच्या या परोपकारी कृतीमुळे गंभीररीत्या आजारी असलेल्या पाच रुग्णांना जीवन आणि दृष्टी मिळाली. अशा परिस्थितीत, गरजू रुग्णांसाठी अवयवदानाची भूमिका किती अनमोल ठरते याविषयी समाजात जागरूकता पसरते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28551 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top