
‘शुभम साहित्य’तर्फे नऊ पुस्तकांचे प्रकाशन
पुणे, ता. १६ : अरुण शेवते संपादित आणि शुभम् साहित्यतर्फे प्रकाशित नऊ पुस्तकांचे प्रकाशन येत्या मंगळवारी (ता. १९) होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीष मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी पाच वाजता घोले रस्ता येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘मी आणि माझे वडील’, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते ‘स्वतःचा आवाज शोधताना’, माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ‘त्या निवडणुका’, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ‘तेथे कर माझे जुळती’, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट यांच्या हस्ते ‘माझे अवघे जग’, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते ‘करोनाचे दिवस’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘त्यांच्या ऋणात’, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे संचालक सचिन ईटकर यांच्या हस्ते ‘माझे अनुभव’ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ‘एक आठवण’ या नऊ पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात सयाजी शिंदे ‘झाड तुमचं भलं करो’ या लेखाचे अभिवाचनही करणार आहेत. रसिकांनी आणि वाचकप्रेमींनी या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक राजेंद्र ओंबासे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28605 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..