हिशेब पत्रके सादर करा, अन्यथा संस्था नोंदणी रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिशेब पत्रके सादर करा, अन्यथा संस्था नोंदणी रद्द
हिशेब पत्रके सादर करा, अन्यथा संस्था नोंदणी रद्द

हिशेब पत्रके सादर करा, अन्यथा संस्था नोंदणी रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : धर्मादाय नोंदणीकृत सार्वजनिक संस्था व मंदिर संस्थानांनी त्यांच्या वार्षिक हिशेबांचे लेखापरीक्षण करून हिशेब पत्रके धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये ऑनलाइन सादर करावीत, असे निर्देश धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिले आहेत. सार्वजनिक संस्थांनी हिशेब पत्रके त्वरित सादर न केल्यास संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सोलापूर, नगर व सातारा जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत धर्मादाय सार्वजनिक संस्था व मंदिर संस्थानांनी न्यासाची हिशेब पत्रके त्यांच्या जिल्हा कार्यालयामध्ये त्वरित सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ३२, २३ व ३४ अन्वये अनेक नोंदणीकृत न्यासांनी वार्षिक हिशेबाचे लेखापरीक्षण धर्मादाय कार्यालयात दाखल केले नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

हिशेब पत्रके सादर न करणे ही दंडनीय बाब आहे. त्यामुळे नोंदणीकृत न्यासांनी लेखापरीक्षण करून तत्काळ लेखापरिक्षीत हिशेब पत्रके २५ जुलैपर्यंत धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाइन दाखल करावीत, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त बुक्के यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28767 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..