मासळीच्या भावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासळीच्या भावात वाढ
मासळीच्या भावात वाढ

मासळीच्या भावात वाढ

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १७ : आषाढामुळे मासळीला मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. आषाढी एकादशीमुळे गेल्या आठवड्यात चिकनचा खप कमी झाला. माल रखडल्याने या आठवड्यात चिकनच्या दरात किलोमागे २० रुपयांनी घट झाली. तर, इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ५० रुपयांनी घट झाली. गावरान अंडी, मटणाचे दर स्थिर होते.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १७) खोल समुद्रातील मासळीची ७ ते ८ टन, खाडीची २०० ते ४०० किलो, तर नदीच्या मासळीची ५०० ते १००० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रोहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते १६ टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटण विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर)- पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे- १५००-१६०० मध्यम : १०००-१२००, लहान ९००-१०००, भिला : ८००-९००, हलवा : ९००-१०००, सुरमई : ९००-११००, रावस : लहान ९००-१०००, मोठा : १२००-१३००, करली : ३२०-३६०, पाला : ७००-१२००, वाम : पिवळी ६००-७००, काळी वाम २४०-४००, ओले बोंबील : २४०-३२०. कोळंबी : लहान ३६०-४००, मोठी-४४०-६००, जंबोप्रॉन्स : १३००-१४००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २५०-४००, खेकडे : २८०-३२०. चिंबोया : ५५०-६००, मांदेली- १४०-१६०, राणीमासा- २००-२४०. खाडीची मासळी : नगली : ४००-५००, तांबोशी : ४४०-६००, बांगडा : लहान-२००-२४०, मोठा २८०, शेवट: ३६०, खुबे : १२०-१४०, लेपा-२४०-३००, वेळुंजी - १६०-२००, तारली-२००-२४०. नदीतील मासळी : रोहू-१६०-१८०, कतला- १६०-१८०, मरळ-४४०, शिवडा- १६०, खवली- २००, आम्ळी- १२०-१४०, खेकडे- २००-२४०, वाम-५५०, चिलापी : ५०. मटण : बोकडाचे : ६६०, बोलाईचे : ६६०, खिमा : ६६०, कलेजी : ७००. चिकन : २००, लेगपीस : २५०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : ३००. अंडी : गावरान : शेकडा : ९२०, डझन : १२०, प्रतिनग : १०. इंग्लिश : शेकडा : ४५०, डझन : ६०, प्रतिनग : ५.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28931 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..