पुण्याची लिटल कॅल्क्युलेटर! 6 वर्षांची ईशानी पाच मिनिटात सोडवते १०० गणिते | Ishani Dhore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishani Dhore
पुण्याच्या लिटल कॅल्क्युलेटरची ‘इंडिया बुक’ने घेतली दखल

पुण्याची लिटल कॅल्क्युलेटर! 6 वर्षांची ईशानी पाच मिनिटात सोडवते १०० गणिते

पुणे : गणितीय आकडेमोड म्हटली तर भल्याभल्यांची मती गुंग होते. पण, पुण्यातील एका सहा वर्षांच्या मुलीने केवळ पाच मिनिटात तब्बल १०० गणिते सोडवली आहे. तिच्या या अनोख्या विक्रमाची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. (Ishani Dhore)

हेही वाचा: ताम्हिणी अभयारण्य, घाट परिसरात पुढील आदेश येईपर्यंत पर्यटनास बंदी

हडपसर येथील ईशानी अक्षय ढोरे या पुण्याच्या लिटल कॅल्क्युलेटरने नुकताच हा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने पाच मिनीट ३३ सेकंदात हा विक्रम पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे ईशानीच्या आईनेच तिला अबॅकसचे प्रशिक्षण दिले. तिच्या या अनोख्या विक्रमाबद्दल आई श्वेता सांगतात, ‘‘मुलांना लहान वयातच अबॅकसचे शिक्षण दिल्यास त्यांच्या पुढील शिक्षणातील गुणवत्तेत बरीच प्रगती होते. ईशानीला सुरुवातीपासूनच गणिताची ओढ होती. मागील आठ महिन्यांपासूनच ती अबॅकस शिकत असून, मागील तीन महिन्यांपासून तिला इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करत होती.’’ यासंदर्भात ईशानीला नुकतेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सध्या ती ‘अमनोरा पब्लिक स्कूल’मध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकते आहे. (Mini Calculator)

हेही वाचा: शेतकऱ्याच्या पोरानं IAS व्हायचं स्वप्न केलं पूर्ण; ओंकारची 'यूपीएससी'त बाजी

‘‘ईशानीने केलेला हा विक्रम आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. तिला अबॅकसचे प्रशिक्षण देण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला आहे. आमचे स्वप्न तिच्यावर न लादता, तिला ज्यात आवड आहे. अशा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आम्ही तिला प्रोत्साहित करत आहे.’’
- श्र्वेता ढोरे, ईशानीच्या आई

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28951 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..