गती वाढण्यासाठी लागणार चार वर्षे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गती वाढण्यासाठी लागणार चार वर्षे!
गती वाढण्यासाठी लागणार चार वर्षे!

गती वाढण्यासाठी लागणार चार वर्षे!

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः लोणावळा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणानंतर २००८ मध्ये ओएचईचे (ओव्हरहेड) डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) मध्ये रूपांतर झाले. मात्र ते काम अपुरे झाले. विद्युतीकरणाचे मास्टला (पोल) एटीडी (ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस ) नसल्याने त्याचा फटका रेल्वेच्या गतीवर होणार आहे. ‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायरला जोडून ठेवणारे ‘टेन्शन’ नसल्याने आता ते रेल्वेला टेन्शन आले आहे. रेल्वेने एटीडी बसविण्याचे काम सुरू केले असले तरीही ते पूर्ण होण्यास आणखी चार वर्षे लागणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वे १३० किमी वेगाने धावण्यासाठी किमान चार वर्षे लागतील.
मुंबई-चेन्नई रेल्वे मार्ग हा देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गपैकी एक मार्ग आहे. सध्या या मार्गावर रेल्वे ताशी ११० किमी वेगाने धावत आहे. येत्या काळात या मार्गावर धावणाऱ्या गाड्याची गती ११० वरून ताशी १३० केली जाणार आहे. त्यासाठी ट्रॅकचे अपग्रेड करण्याचे काम सुरु आहे. पुणे-दौड दरम्यानचा ट्रॅक ताशी १३० किमीचा फिट केला आहे. मात्र केवळ ट्रॅक अपग्रेड करून चालणार नाही. त्यासाठी ओव्हरहेडचे देखील काम झाले पाहिजे. पुणे-लोणावळा दरम्यानच्या ओव्हरहेडला ‘एटीडी’ नसल्याने रेल्वे ताशी ११० किमी वेगाने धावतील. याचा नाहक फटका प्रवाशांना बसणार आहे.

‘टेन्शन’ म्हणजे काय ?
‘ओएचई’साठी मेटलच्या वायरचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर या वायर प्रसरण पावतात. तर हिवाळ्यात थंडीमुळे आकसले जातात. वायर पसरली तर पेंटोग्राफ तुटण्याची शक्यता अधिक असते. जर वायर आकसली तर वायरच तुटण्याची भीती असते. हे सर्व टाळण्यासाठी रेल्वे मास्टच्या दोन्ही बाजूला ‘टेन्शन’ म्हणजे ११०० किलोचे वजन लटकून ठेवते. यामुळे उन्हाळा व हिवाळा या दोन्ही स्थितीत वायरला कोणताच धोका निर्माण होत नाही. पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेने हेच ‘टेन्शन’ न ठेवल्याने पुणे रेल्वेला आता ‘टेन्शन’ आले आहे.

‘टेन्शन’ कसे दिले जाते?
‘ओएचई’च्या कॅटनरी व कॉन्टॅक्ट वायर या सरळ व ताट राहण्यासाठी ‘टेन्शन’ दिले जाते. यासाठी पोलच्या दोन्ही बाजूला ६६५ किलो वजनाचे काउंटर वेट (मेटलचे प्लेट) ठेवण्यात येते. यासह पुलीचा देखील वापर होतो. प्लेट व पुली मिळून एका बाजूला ११०० किलोचे वजन तयार होते. दोन्ही बाजूला २२०० किलोचे वजन निर्माण झाल्याने ओव्हरहेड वायर सरळ व ताट राहण्यास मदत होते. परिणामी पेंटोग्राफ सुरक्षित राहून गाडीची गती वाढण्यास मदत होते.

थोडक्यात महत्त्वाचे
१. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करताना एक किमीच्या अंतरावर २० पोल उभारले जातात
२. दीड किमीच्या अंतरावर एक ''टेंशन'' दिले जाते
३. देशांत सर्वप्रथम १९२५ साली मुंबईत विद्युतीकरण झाले. त्यावेळी रेल्वे ‘डीसी’ वर धावत होत्या
४. १९३० साली कोलकता (हावडा ) येथे सर्वप्रथम ''एसी'' वर रेल्वे धावू लागल्या
५.डीसी मध्ये १५०० व्होल्ट प्रवाहित असतो
६. एसी मध्ये २५००० व्होल्ट प्रवाहित असतो

पुणे-लोणावळा दरम्यान ऑटोमेटेड टेन्शन डिव्हाईस नाही. त्यामुळे लोणावळा पासून हे काम सुरु झाले आहे. मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षाचा वेळ लागण्याची शक्यता. हे काम पूर्ण झाल्यावरच प्रवासी रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावतील.
- बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28990 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..