शाळांचे निकाल : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांचे निकाल :
शाळांचे निकाल :

शाळांचे निकाल :

sakal_logo
By

विबग्योर हायस्कूलमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे, ता. १७ : विबग्योर हायस्कूलच्या मगरपट्टा, बालेवाडी, एनआयबीएम शाखेतील आयसीएसई परीक्षा दिलेले १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मगरपट्टा शाखेतील दिथी गांधी (९८.३३ टक्के), वंश शहा (९८.१६ टक्के), अक्षन बन्सल (९८ टक्के) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहेत. तर बालेवाडी शाखेतील शाळेत सिद्धांत बर्वे (९९ टक्के), आदित्य भट (९८.६ टक्के), राशी मलिक (९८.२ टक्के), अनिकेतकुमार (९८.२ टक्के) यांनी अग्रक्रम मिळविले आहेत. तर एनआयबीएम येथील शाळेतील आदिती सावंत (९९ टक्के), नाव्या कोम्मुरी आणि ध्रुव सावंत (९८.८ टक्के), सिद्धांत भारद्वाज आणि विहान गुप्ता (९८.४ टक्के) यांनीही अव्वल दर्जा प्राप्त केला आहे.

‘सेंट मेरीज’मधील विद्यार्थिनी देशात पहिली
पुणे, ता. १७ : सेंट मेरीज् स्कूलमधील हरगुन कौर मथारू हिने ९९.८० टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर शिवानी देव हिने ९९.६० टक्के गुण मिळवीत देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शाळेतील २०५ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यात ९२ विद्यार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर ६१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28992 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top