मुलाखतीतून उलगडला चिंटूचा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाखतीतून उलगडला चिंटूचा प्रवास
मुलाखतीतून उलगडला चिंटूचा प्रवास

मुलाखतीतून उलगडला चिंटूचा प्रवास

sakal_logo
By

कोथरुड, ता. १७ ः ‘‘चिंटू येताना एकटा येत नाही. त्याच्यासोबत त्याचे कुटूंब, मित्र मंडळी व सभोवतालचे लोकही येतात. चिंटूमध्ये प्रत्येकवेळी विनोदच द्यायचा असे आम्ही कधीच केले नाही. बरेचदा तरल भावनांचा वापर केला आहे,’’ या शब्दांत सुप्रसिध्द व्यंगचित्रकार चारुहास पंडीत चिंटूचा प्रवास उलगडला.
भावार्थ पुस्तकालयत झालेल्या शब्दयात्री कार्यक्रमातील मुलाखतीत पंडीत बोलत होते. प्रसन्न करंदीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. चारुहास पंडीत म्हणाले की, आता कॉमिक्समध्ये खुप छान प्रयोग होतात. परंतु आत्ता जे व्यंगचित्र दिसतात ते पाश्चिमात्य वाटतात. चिंटू मात्र अगदी आपल्या घरातला वाटतो. वर्तमानपत्रात ३ कॉलम बाय ५ हा आपला कॅनव्हास आहे. त्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त खिळवून ठेवायचे असते. त्यासाठी मी व प्रभाकर वाडेकर मिळून खुप वेगवेगळे प्रयोग केले. चिंटू न दाखवता सुध्दा चिंटू असल्याचा फील येईल असे सुध्दा चित्र काढले.
टीडब्ल्यूजे- द सोशल रिफॉर्मचे ऋषीकेश पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29028 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top