
बांधकाम कामगार होणार अधिक कुशल
पुणे, ता. १८ : नागरिकांच्या बदललेल्या गरजांप्रमाणे होणारे बांधकाम, त्यासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत साधने आणि तंत्रज्ञान वापरण्यास कुशल कामगार उपलब्ध होत नाही. या समस्येला आजही अनेक बांधकाम व्यावसायिक तोंड देत आहे. आता मात्र पुरेसे आणि कुशल कामगार शोधण्यासाठी करावी लागणारी कसरत लवकरच थांबणार आहे.
बांधकामांसाठी आवश्यक सर्व कौशल्यांसह चांगले कर्मचारी बांधकाम क्षेत्राला मिळावे यासाठी कुशल आणि क्रेडाई पुणे मेट्रोने पुढाकार घेतला आहे. ‘रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट’चा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पीजीडी) आणि ‘बीबीए रिअल इस्टेट आणि शहरी पायाभूत सुविधा व्यवस्थापन’ असे दोन नवीन अभ्यासक्रम कुशल क्रेडाईने तयार केले आहेत. एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी येथे हे कोर्स शिकवले जाणार आहे. तरुण विद्यार्थ्यांना व्यावहारिक विकसित करण्यास सक्षम करण्यासाठी कंत्राटदार तसेच विकसक कामाचा दृष्टिकोन आणि चांगल्या बांधकाम पद्धती विकसित करणे हा हे अभ्यासक्रम सुरू करण्यामागील उद्देश आहे.
बांधकाम उद्योगाच्या गरजा पुरविणारा डिप्लोमा :
पदवीत्तर डिप्लोमा एक वर्षाचा असेल. हा डिप्लोमा बांधकाम उद्योगाच्या गरजा आणि मागण्यांना प्रतिसाद देण्यासाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. या कोर्सचा उद्देश शहर आणि ग्रामीण भागातील पदवीधरांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करणे हा आहे. हा अभ्यासक्रम शिकलेले विद्यार्थी स्टोअर-कीपर, पर्यवेक्षक, गुणवत्ता हमी तंत्रज्ञ, सुरक्षा तंत्रज्ञ या पदांच्या नोकरीसाठी पात्र असणार आहेत. तर दुसरा हा अभ्यासक्रम बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाच्या क्षेत्रावर केंद्रित आहे. जमीन, सर्वेक्षण, खर्चाचा अंदाज, बांधकाम नियोजन, कामगार नियामक प्रक्रिया आणि प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी हा अभ्यासक्रम सक्षम करतो.
कुशल कामगारांची कमतरता हा बांधकाम क्षेत्राला भेडसावणारा कायमचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवत व्यवसायिकांच्या अडचणी कमी करणे आणि तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. या अभ्यासक्रमांची रचना देशातील आणि बाहेरील विविध उद्योग क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेल्या नवीन व्यवस्थापन पद्धती पुरविण्यासाठी केली आहे.
- जे. पी. श्रॉफ,
अध्यक्ष, कुशल आणि क्रेडाई पुणे मेट्रो कामगार कल्याण समिती
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29071 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..