दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः मेरी सहेली मंडळातर्फे दिव्यांग मुले आणि गृहिणींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. मंडळाच्या अध्यक्षा देवी तन्ना अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहेत. यंदा मंडळाचे २१ वे वर्ष असून गेली दोन वर्षे कोरोनामुळे कोणतेच उपक्रम राबविले नाही. यंदा प्रदर्शनात अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालय आणि प्रा फाउंडेशन संस्थेच्या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या राख्या, विविध आकर्षक वस्तु तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी बनवलेल्या वस्तु व पदार्थांचा समावेश आहे. हे प्रदर्शन बुधवार (ता. २०) आणि गुरुवारी (ता. २१) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बिबवेवाडी येथील लाईटहाऊस मॉल येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29150 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..