
पुणे परिसरात हलक्या सरींची शक्यता
पुणे, ता. १८ ः शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. गेल्या आठवड्यात दमदार हजेरीनंतर पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहणार असून, हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शहरात सोमवारी (ता. १८) सकाळपासून हलक्या सरी राहून पडत होत्या. शहरात २.९ मिलिमीटर, तर लोहगाव येथे तीन मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात धुवाधार पडणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील आठवडाभर म्हणजेच रविवारपर्यंत (ता. २४) हे चित्र असेच कायम राहू शकते. शहर व परिसरात आकाश अंशतः ढगाळ, तर दुपारनंतर सामान्यतः ढगाळ होत पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात, असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.
हंगामातील एकूण पाऊस (१ जून ते १८ जुलैपर्यंत)
ठिकाण ः पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पुणे ः ३४२.४
पाषाण ः ४०४.१
लोहगाव ः ३२२.४
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29350 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..