‘उद्योजकीय मानसिकतेच्या नोकरदारांचा व्हावा सन्मान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उद्योजकीय मानसिकतेच्या नोकरदारांचा व्हावा सन्मान’
‘उद्योजकीय मानसिकतेच्या नोकरदारांचा व्हावा सन्मान’

‘उद्योजकीय मानसिकतेच्या नोकरदारांचा व्हावा सन्मान’

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘उद्योजकीय मानसिकता असलेल्या नोकरदारांमुळे अनेक उद्योग यशस्वी झाले आहेत. त्यांचेही योगदान व्यवसायात तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच उद्योजकाबरोबरच नोकरदाराचाही सन्मान व्हायला हवा’, असे मत सेटको सिडल्सचे संचालक राजेश मंडलिक यांनी व्यक्त केले.
पुस्तकविश्व आयोजित विजय पवार लिखित व रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशित ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी स्टर्लिंग सिस्टीम्सचे संचालक सतीश पवार, कन्साईज इंजिनिअरिंग सोल्युशनचे संचालक मनोज गायकवाड, विद्यार्थी सहाय्यक समितीच्या उद्योजकता विकास केंद्राचे अध्यक्ष तुषार रंजनकर, पॉकेट कॅफेचे फाऊंडर अभिजित घाटगे, रूद्र एंटरप्राइजेसचे नवनाथ जगताप उपस्थित होते. विजय पवार यांनी उद्योजकीय वाटचाल ते लेखक हा प्रवास उलगडून सांगितला. रंजनकर यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीच्या उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सचिन म्हसे यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीला ३० हजार रुपये किमतीची पुस्तके भेट दिली. नवनाथ जगताप यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत वाघे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29365 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..