कोरोना ‘बीए.५’ व्हेरियंटचे राज्यात २६ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना ‘बीए.५’ व्हेरियंटचे राज्यात २६ नवीन रुग्ण
कोरोना ‘बीए.५’ व्हेरियंटचे राज्यात २६ नवीन रुग्ण

कोरोना ‘बीए.५’ व्हेरियंटचे राज्यात २६ नवीन रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘बीए. ५’ आणि ‘बीए.२.७५’चे मिळून ३९ नवीन रुग्णांचे राज्यात निदान झाले. त्यातील २३ रुग्ण मुंबईमधील, तर १३ रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आरोग्य खात्यातर्फे सोमवारी दिली.

राज्यात आढळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी वेगवेगळ्या अद्ययावत प्रयोगशाळांना देण्यात येत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ‘बीए.२’ आणि ‘बीए.३’ या ओमिक्रॉनचे उपप्रकार असलेले व्हेरियंट आढळत होते. गेल्या काही महिन्यांपासून ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ तसेच, ‘बीए.२.७५’ या उपप्रकारच्या रुग्णांचे निदान होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य खात्याने नोंदविला आहे. वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे. याअंतर्गत पुण्यातील ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ (एनआयव्ही) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या दिलेल्या ताज्या अहवालानुसार राज्यात ‘बीए.५’ आणि ‘बीए.२.७५’चे मिळून ३९ नवीन रुग्ण आढळले आहेत, असे खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

राज्यात ‘बीए.५’चे २६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ‘बीए.२.७५’ या व्हेरियंटच्या १३ रुग्णांचे निदान झाले आहेत. यातील २३ रुग्ण हे मुंबई, तर १३ रुग्ण हे पुणे येथील आहेत. याशिवाय बुलडाणा, ठाणे आणि लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व नमुने २९ जून ते ४ जुलै यादरम्यान घेतले होते. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ रुग्णांची संख्या १५८ पर्यंत वाढली आहे. ‘बीए.२.७५’ रुग्णांची संख्या ७० झाली आहे.

कोरोना उद्रेक दृष्टिक्षेपात
शहर ........ ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ ..... ‘बीए.२.७५’
पुणे ..........९१ ................................... ४३
मुंबई ....... ५१ ................................... ५
ठाणे ......... ५ ................................... १
नागपूर, पालघर ...... प्रत्येकी ४ ......... १४
रायगड .......... ३ ...............................०
अकोला ..................०.......................... ४
यवतमाळ, बुलडाणा, लातूर ........०....... प्रत्येकी १

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29376 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top