
सोनी मराठी वाहिनीवर ‘जिवाची होतिया काहिली’ सुरुवात
पुणे, ता. १९ ः सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसाठी एक नवी प्रेमकहाणी मालिकेच्या माध्यमातून सुरू झाली आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर १८ जुलैपासून आली आहे.
मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे. प्रेमाला भाषा नसते, हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘पिरती दोघांची भाषे पलीकडची’ असा संदेश या मालिकेतून समजतो आहे. नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे कलाकार एका नव्या भूमिकेत दिसतील. अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडतील. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. सुबोध खानोलकर हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29542 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..