इलेक्ट्रो-कॉटरीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रो-कॉटरीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया
इलेक्ट्रो-कॉटरीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

इलेक्ट्रो-कॉटरीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः येथील लष्कराच्या कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेतील डॉक्टरांनी ६३ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याची यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेत इलेक्ट्रो-कॉटरी या वैद्यकीय पद्धतीचा वापर करत रुग्णाची कर्करोगाची गाठ काढण्यात आली. महत्त्वाचे म्‍हणजेच सशस्त्र दलांच्या वैद्यकीय आस्थापनेत प्रथमच अशा पद्धतीचा वापर करत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस या संस्थेद्वारे हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार दिले जात आहेत. सहव्याधी असलेल्या या माजी अधिकाऱ्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे काही महिन्यांपूर्वी झालेल्या वैद्यकीय चाचणींमधून समजले. खोकला, खोकल्यातून रक्त अशा लक्षणांवरून रुग्णाची चाचणी करण्यात आली होती. यासाठी पाच डॉक्टरांच्या पथकाने सुमारे तीन तास ‘रिजिड ब्रॉकोस्कोपी’ ही तपासणी आणि इतर प्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या श्र्वसनमार्गातील अडथळे दूर झाले. तसेच त्याच्या डाव्या फुफ्फुसाचे प्रसरण करण्यात डॉक्‍टरांना यश आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29682 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top