पथकांना सरावासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथकांना सरावासाठी 
पर्यायी जागा देण्याची मागणी
पथकांना सरावासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी

पथकांना सरावासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ढोल-ताशा पथकांना जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये सराव करण्यासाठी पालिकेकडून परवानगी दिली आहे. त्यानुसार पथकांनी मांडवा टाकून सराव सुरू केला आहे. मात्र, महापालिका मैदानात इतर खेळांच्या सरावासाठी परवानगी देवू शकत नाही, असा दावा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने केला आहे. त्यामुळे पथकांना सराव करण्यासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

स्वारगेट येथे असलेल्या या स्टेडीयममध्ये कबड्डीच्या मैदानाजवळ पथकांना सरावासाठी परवानी दिली आहे. त्यामुळे सरावासाठी पथकाकडून मांडव टाकला आहे. मात्र, हा मांडव रस्त्यात आल्याने ये-जा करण्यासाठी अडचण येत आहे. तसेच खेळाडू संध्याकाळच्या वेळी सरावासाठी मैदानात येतात. त्या सर्वांना पथकाच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांनी एकतर उशिरा सराव करावा किंवा पालिकेने त्यांची इतर ठिकाणी सोय करावी, अशी मागणी करणारे पत्र पालिका आयुक्तांना दिल्याची माहिती असोसिएशनचे सचिव रवींद्र आंदेकर यांनी दिली.

स्टेडीयमची जागा इतर उपक्रमांना देण्यावरून यापूर्वी देखील वाद झाले आहे. ते प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने तेथे असलेल्या खेळांव्यतिरिक्त इतर बाबींसाठी जागा वापरण्यास मनार्इ केली आहे. पालिका आयुक्त ११ महिन्याच्या करारावर स्टेडियमची जागा देवू शकता. मात्र, मैदानात असलेल्या खेळा व्यतिरिक्त इतर बाबींना तेथे परवानगी देवू शकत नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी राजकीय दबावाखाली निर्णय घेवू नये. पथकांना सरावासाठी पर्यायी जागा द्यावी.
-संजय बालगुडे, माजी नगरसेवक

पथकांना सराव करण्यास परवानगी देण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना आहे. त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली आहे. असोसिएशनने दिलेल्या पत्रावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जार्इल.
-संतोष वारुळे, उपायुक्त, सांस्कृतिक आणि क्रीडा विभाग, महानगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29761 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top