पुण्यात ऊन सावलीचा खेळ कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात ऊन सावलीचा खेळ कायम
पुण्यात ऊन सावलीचा खेळ कायम

पुण्यात ऊन सावलीचा खेळ कायम

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः पुण्यात संततधार पावसाने विश्रांती घेतली असून सध्या शहर व परिसरात ऊन सावलीचा खेळ कायम आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात राहू-राहून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मंगळवारी (ता. १९) मात्र दिवसभर ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळाला. पुणेकरांना चक्क उन्हात पावसाची अनुभूती झाली. पुणे शहरात आणि लोहगाव येथे ०.२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारपर्यंत (ता. २५) पुणे व परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान हे साधारणपणे ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोचू शकते.

राज्यातही जोर कमी
राज्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसाच्या दणक्यानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विदर्भ आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर ओसरण्याची स्थिती तयार झाली आहे. दरम्यान बुधवारी (ता. २०) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

विदर्भात मुसळधार
जुलै महिन्यात पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाने दाणादाण झाली. सोमवारी (ता. १८) विदर्भात जोरदार, तर कोकण, घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर मात्र मंगळवारी (ता. १९) राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. सध्या अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे ओमानकडे सरकून विरले असून पूर्व किनाऱ्यावरील उत्तर ओडिशा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकून निवळले. दरम्यान मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत आहे. पश्‍चिम किनाऱ्याला गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाला आहे. त्यातच राज्यावर पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे. तर पुढील चार दिवस विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29763 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top